I'm Sushant, a passionate writer, avid reader, and a lifelong explorer of diverse cultures and ideas. Here on my blog, I invite you to join me on a journey through the vibrant tapestry of life, as we delve into the realms of literature, Philosophy, and the beauty of the human experience.
Wednesday, October 2, 2024
प्रेम??
प्रेम... हा शब्द वाचला तरी खुप काही तुमच्या डोळ्यासमोरुन जात असेल, मग ती एक particular व्यक्ति असो किंवा वस्तु,खुप भावनांची उलथापालथ होत असेल...(पण इथं आपण वस्तु बद्दल नको बोलायला इथं जेंव्हा जेंव्हा प्रेम हा शब्द येईल तेंव्हा तो Romantic relations बद्दल बोलेल) म्हणजे लहानपणापासुनचं आपण हे सगळ बघत आलोय..माणसं एकत्र येतात, एकमेंकाच्या प्रेमात पडतात आणि मग जादु झाल्यासारखी आयुष्यभर सुखानं एकमेंकाना साथ देतात...प्रेम makes them complete,प्रेम त्यांना पुर्णात्वाकडे नेतं आणि आयुष्यभर ते ज्या अर्थाच्या शोधात असतात तो त्यांना सापडतो... प्रेम करायला आपला मेंदु लहानपणापासुन Subconciously शिकत असतो मग प्रेम म्हणटल कि एकमेंकाची काळजी आली, respect आला, एकमेंकासोबत Adjustment आली आणि त्यासाठी Sacrifice म्हणजेच त्याग आला,आपल्या पालकांना, कूटुंबातील इतर सदस्य, मित्रांना किंवा अगदिच काय आपण पाहत असलेला सिनेमा ह्यात अश्याच प्रकारचं प्रेम करताना बघत आपण लहानाचे मोठे होत असतो आणि आपल्याला वाटतं कि एका प्रेमासाठी एवढ सगळ करायला लागतं आणि तेच आपलं Idea of love होऊन जातं.. पण खरच त्या Adjustment ची, त्यागाची गरज आपल्याला असते का? कि प्रेम आपल्याला पुर्ण करतं,जीवनाला अर्थ देतं म्हणुन desperetly आपण त्यात राहायचा आणि ते टिकवायचा प्रयत्न करत असतो कारण समाजाचं अस म्हणण असत कि प्रेम, लग्न, संसार हे महत्वाच आहे, माणुस एकटा राहु शकत नाही, एकटं राहण is श्राप आणि आपण एकटं राहु ह्या भीतीनं आपण आपलं स्व:त्व गमावुन प्रेमात forcefully आनंदी असल्याचं स्वत:ला make believe करु देत असतो आणि स्वत:भोवती एक bubble तयार करतो आणि एकट्यात असताना स्वत:ला विचारतो "मला हेच हवं होतं का?" आता ह्याचं उत्तर आपण स्वत:ला किती honestly देतो हे महत्वाचं असतं किंवा कधी कधी भिऊन हा प्रश्नच आपण स्वत:ला विचारत नाही,असो पण मला आठवतयं कि जेंव्हा मी माझ्या recent relation मध्ये होतो आणि समोरच्या माणसानं मला हळुहळु बदलायचा प्रयत्न केला तेंव्हा मला अचानक एकदिवशी वाटल कि, मी जेंव्हा "मी" होतो तेंव्हा स्वत:ला आवडायचो पण कुणालातरी आवडावं म्हणुन मी बदललो आणि त्या समोरच्या व्यक्तिला जसा हवाय तसा झालो पण ह्यात मी "मी" कुठ राहलो, माझ स्वत:वरच प्रेम संपल... म्हणजे तिला जसा हवायं तस मी स्व:ताला mold केलं त्याची माझ्याबद्दल जी Idea of me होती त्यानुसार म्हणजे समोरचा माणुस मी जो मुळ होतो त्यावर प्रेम न करता तिला जो "मी" हवा होतो त्या माझ्या Idea of me च्या तिनं तिच्या मनात तयार केलेल्या "मी" च्या प्रेमात होती.मी खुश नव्हतो पण pretend करायचो आणि बाहेर बाहेर बघता खुप खुश वाटायचो आणि माझ्याकडे बघुन माझ्या मित्रांना, Family ला सुद्धा तेच वाटायचं आणि माझ्याकडे बघुन मला जे लहानपणी मोठ्यांना बघताना वाटायचं तेच माझ्या आजुबाजुच्यांना वाटायचं आणि त्यांना वाटायचं कि "प्रेम खरच किती भारी आहे, त्यात आपल्या जीवनाला पुर्णत्व प्राप्त होऊन आयुष्याला नविन अर्थ प्राप्त होतो" आणि this cycle goes on... आपण कुणावर तो आहे तसा प्रेम करु शकतो का? हा प्रश्न नक्कीच विचारला पाहिजे आणि सोबतच आपण आता ज्या व्यक्तिसोबत आहोत ती खरच bottom of their heart आपल्यावर प्रेम करते का? का ती सुद्धा आपल्यासारखी एकटं राहण्याच्या भीतीनं आपल्यासोबत राहतीये? ह्यात फरक एवढाच असतो कि एकतर ती आपल्याला त्यांच्या idea of perfect partner मध्ये बदलतीये किंवा तुम्ही तरी ते करत असाल,मग हे खरच प्रेम आहे का भीती? आणि तुम्हाला वाटत असेल कि खरच तुमचं एकमेंकावर प्रेम आहे तर तुम्ही भिऊन हा प्रश्न टाळतायं आणि तुम्ही त्या illusion मध्ये आहात..
Subscribe to:
Post Comments (Atom)
why can't we be friends?
अनपेक्षित भेटी होत राहतात. माणसं आपल्या आयुष्यात येत राहतात, जात राहतात, आणि काही आपल्याला नकळत आतून हलवून जातात. तशीच तीही भेटली. मी आधीच...
-
अनपेक्षित भेटी होत राहतात. माणसं आपल्या आयुष्यात येत राहतात, जात राहतात, आणि काही आपल्याला नकळत आतून हलवून जातात. तशीच तीही भेटली. मी आधीच...
-
वाचणं खरतर खुपच complex क्रिया आहे (आता इथं वाचणे म्हणजे कुणाच्या तावडीतुन किंवा संकटातुन नाही तर पुस्तकांची पानं थुंकी लाव...
-
प्रेम... हा शब्द वाचला तरी खुप काही तुमच्या डोळ्यासमोरुन जात असेल, मग ती एक particular व्यक्ति असो किंवा वस्तु,खुप भावनांची उलथा...
No comments:
Post a Comment