Wednesday, October 23, 2024

वाचणं (Reading)

     वाचणं खरतर खुपच complex क्रिया आहे (आता इथं वाचणे म्हणजे कुणाच्या तावडीतुन किंवा संकटातुन नाही तर पुस्तकांची पानं थुंकी लावुन पलटत जाणे आणि त्यावरच्या अक्षरांचा अर्थ लावत जीवनाचा अर्थ शोधायचा प्रयत्न करत ह्या Earth वर भटकत राहणे असा आहे) वाचण्याचा माणसाची उत्क्रांती होत असताना Survive होण्याशी काडीमात्र संबध नाही,तरी हि सध्या वाचनाला काही लोक "Survival Skill" म्हणताना दिसतायेत, अर्थात वाचुन तुम्हाला 'उत्क्रांती आणि Survival' ह्या शब्दांची उत्पत्ती आणि गहन अर्थ कळेल पण त्याचा खऱ्या वास्तववादी जगात Survival साठी किती उपयोग होईल सांगता येत नाही.. फक्त हा माणुस वाचतो म्हणजे बुद्धीजीवी (intellectual) आहे असं समाजाचं उगाच कौतुक मात्र फुकट मिळवता येतं पण नुस्तं वाचुन फुशारकी मारायला वापरायचं Knowledge म्हणजे 'मित्राची बाईक उधार घेऊन शायनिंग मारत गल्लोगल्ली फिरण आणि हि चालवत असलेली गाडी माझी आहे असा समज करुन घेणे' असो,पण काही लोकांना पुस्तक खरेदी करुन ती वाचावीशी वाटतात ह्यातच आपली लुप्त होत जाणारी वाचन संस्कृती धन्यता मानतीये नाहीतर कधीच साहित्य म्हणजे फक्त घरातला किराणा माल असाच काय त्याचा अर्थ उरला असता. त्यात हे असले वाचक म्हणे पुस्तकांना खुप जपतात एकदा घेतलेलं पुस्तक हे जपुन कपाटात ठेवतात आणि परत Emergency मध्ये किंवा 1 जानेवारी ला किंवा 'जागतिक पुस्तक दिन' 'जागतिक वाचक दिवस' 'चला कुणालातरी Impress करुया दिवस' अश्या खास दिवसांसाठीच बाहेर काढुन Aesthetic बघुन तो फोटो सोशल मीडीया वर शेअर करुन खाली शेअरेबाजी करतात आणि लाईक्स, कमेंटस पुरते आपल्या Posts सांभाळतात. 
     वाचाल तर वाचाल हे असलं वाचाळ वाक्य फक्त Truck मागे, एखाद्या लायब्ररीत, शाळेत फळ्यावर, ज्याची पुस्तकं जास्त खपत नाहीयेत असे लेखक, विक्रेते आणि नवोदित वाचकांच्या तोंडी चांगलं वाटतं आणि खरच मला नेहमी त्यांचं कौतुक वाटत आलय आणि त्यात कहर म्हणजे कुठल्यातरी अलौकिक,अलंकारिक शब्दांच्या पेटाऱ्यात हात घालुन,भावनांच्या दोऱ्यात हे Emotions trigger करणारी वाक्य एकामागुन एक गुंफणारा शब्दांचा जादुगर (हातसफाई करणारा) अमुक लेखक आणि त्याची अलंकारिक, अति Romanticize केलेली फक्त त्यालाच कळलेली (ते पण इतर लेखकांच वाचुन)  Psudo-Philosophy आणि हे वाचुन आपल्याला आयुष्य कळलयं (त्या अमुक लेखकांन लिहलेल) हे बऱ्याच जणांना वाटतं जस Osho,J. Krishnamurti ,अमुक गुरु, तमुक philosophy समजवुन सांगणारा ऐकला कि मला निर्वाणाचा मार्ग कळाला असुन मी Enlightine झालोय असं समजणारी काही स्वयंप्रकाशित लोक आणि मग वर्षानुवर्ष दर दिवशी किंवा दिवसाआड Calligraphy केलेली त्या लेखकांची वाक्य status ला टाकुन स्वत:च्या समजेचा Status आपल्या सोशल मिडीया वर निर्धास्तपणे आणि आत्मविश्वासाने (फाजिल) प्रदर्शित करत असतात आणि हल्ली तर trend आलाय आयुष्यात काहीही प्रॉब्लेम आला कि त्यावर एक ना एक तरी पुस्तक सुचवणारे रिळस्टार प्रत्येक scroll गणिक दिसतात पण वाचन संस्कृती हि आत्मशोधाची,मननाची आणि चिंतनाची गोष्ट नसुन फक्त एक कृती आहे हे त्यांनी खरच दाखवुन दिलयं. पण अस नाहीये कि फक्त हि एकच बाजु आहे खरतर नाण्याला नेहमी दोन बाजु असतात unless & until ते नाणं 'शोले' फिल्ममधील नसेल तर (Cinephile लोकांना हा reference समजेल otherwise शोले मधला हा coin वाला सीन कुठल्यातरी रिलवर येईलच, कारण हल्ली मनी चाले ते रिली दिसे अस आहे) तुम्हाला आता प्रश्न पडेल कि हा बाबा का एवढ बोलतोय (लिहतोय)  वाचनाबद्दल, तर हा माझा Complex आहे आणि मी सुरुवातीलाच म्हणटलय (लिहलय) कि, वाचणं खरतर खुपच Complex क्रिया आहे. 
                             _सुशांत मधाळे

No comments:

Post a Comment

why can't we be friends?

  अनपेक्षित भेटी होत राहतात. माणसं आपल्या आयुष्यात येत राहतात, जात राहतात, आणि काही आपल्याला नकळत आतून हलवून जातात. तशीच तीही भेटली. मी आधीच...