अचानक काहीतरी लिहायला बसणं किंवा लिहण्याची सवय नसली कि लिहणं खुप कठिण असतं अस मला वाटतं. काय लिहु? कसं लिहु? असे बरेसचे प्रश्न स्त्रवत असतात. खुप विचारांची गर्दी होत असते मग काही क्षणांसाठी वाटतं, हे विचारच लिहावेत का? पण नाही, ते executie करणं खुप अवघड वाटतं, मेंदु ताण घ्यायला नाही म्हणतो, Cognitive dissonance pop up होतो. कदाचित विचारांत Lack of clearity असल्यामुळं लिहताना त्रास होत असावा, त्यातल्या त्यात दिवसभरात असंख्य कामाचे-बिनकामाचे विचार डोक्यात घोंगावत असतात त्यातला एक विचार निवडुन त्यावर लिहणं म्हणजे मॉल मध्ये जाऊन हे घेऊ? का ते घेऊ? करत शेवटी judge होण्याच्या भीतीनं च्युईंग-गम घेऊन बाहेर पडण्यासारखं आहे. lack of decision making मुळं होत असाव हे.
लिहण्यासारखं आयुष्यात काहीच घडत नाहीये असं हि वाटायला लागतं,आपणच आपल्याला Boare समजु लागतो... मी कसा intresting होऊ शकतो ह्याचं planning डोक्यात शिजु लागतं, आणि हल्ली ह्या social media च्या वादळात आपला attention span आणि Consistency Reels सारखी खालावलीये हे सततच्या brain storming नंतर कळतं आणि माझ्यातली चिकाटी सुद्धा किती Non sticky झालीये हे सत्य माझ्यासमोर नागडं होतं, त्या सत्यावर कापड टाकायला सुद्धा मी घाबरतो म्हणजे आपण भित्रे आहोत हे कळतं,ती feeling घालवायला दुसरा कुठलातरी उद्योग आपण हातात घेऊन escape व्हायचा प्रयत्न करतो पण आपण किती पळपुटे आहोत ह्याचं एक realisation जोरात तोंडावर येऊन आदळतं मग आपण किती चुकिचे आहोत वैगेरे सारखे विचार डोक्यात लाखो करोडो न्युरोन्स मार्फत Brain steam खाली मज्जासंस्थेतुन travel करत अखंड शरीरभर हा संदेश वाहायला सुरु करतात मग आपण ठरवतो कि ह्यावरच लिहु काहीतरी पण आपलचं नागडेपण लिहायची हिंमत होत नाही किंबहुना ते झेपत नाही आत्महत्येचे विचार येतात पण ती करायला सुद्धा हिंमत लागते त्यामुळ तो विचार सुद्धा रद्द होतो... हातातला पेन आपोआप खाली जमिनीवर पडतो आणि लिहणं नकोच म्हणुन आपण त्या कागदाचं विमान करुन दुर दुसऱ्या Ignorance च्या देशात ते पिटाळुन लावतो...आता कधीतरी जेंव्हा माझ्यातल्या ह्या सगळ्या inferiorties,Complexes, traumas कमी होतील किंबहुना संपतील तेंव्हाच लिहायला बसु असा विचार डोक्यात येतो आणि पुस्तक उघडुन,लिहण्यातुन "वाचलं" पाहिजे असा एक भ्रामक सल्ला मी स्वत:ला देतो निदान सल्ले देण्यात तरी मी पटाईत आहे हा thought माझा ego सुखावुन जातो.
-सुशांत मधाळे
No comments:
Post a Comment