"जेंव्हा मी माझा past आठवतो तेंव्हा मला अस वाटतं कि मी कोणता तरी सिनेमा बघितलाय आणि त्यातले सीन्स (it's not 'Sins' it's 'Scenes) आठवतोय तो खरच घडुन गेलाय अस मला वाटत नाही म्हणजे काल घडलेली आठवण सुद्धा माझी नाहीये अस वाटतं.. मी कोणतरी वेगळाच आहे जो रोज वेगळा म्हणुन जन्मतो आणि रोज वेगळा जगतो.. काल माझ्यासाठी exists च करत नाही किंवा मी जो 'काल' जगलो तो माझा नाहीये.. मग त्यात माझे past relations, जुने मित्र, चांगल्या वाईट आठवणी हे सगळ दुसऱ्या कुणाच्यातरी आयुष्यात घडलय आणि ते मला माहितेय एवढाच feel होतो,बाकी माझा त्यांच्याशी काहिच संबंध नाही...जुने traumas सुद्धा आठवत नाहीत.. काहीच feel होत नाहीये म्हणजे मी हे आता लिहतोय कदाचित उदया हे वाचल्यावर हे मी लिहलय अस मला वाटणार नाही.. आता हे किती नॉर्मल आहे हे मला खरच माहित नाही किंवा चांगल कि वाईट आहे हे सुद्धा माहित नाही पण हे जग आता ह्या point ला सुरु आहे गेलले सगळ नष्ट होत जातय जे कधीच आपल्याला दिसणार नाही फक्त जाणवत राहिल, आठवणीत राहिल पण ते नाहीये, ते तेंव्हा होत पण आता ते काहीच नाहीये, त्या क्षणाची किंवा तेवढ्या काळाच्या पट्टयातली माणसं फक्त आहेत त्या गोष्टींची साक्षीदार पण ते जेंव्हा जातील तेंव्हा त्या सगळ्या घटनांचा केंद्र बिंदु मी असेन आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंतच त्या असतील माझ्यानंतर त्या पण नष्ट होतील आणि त्या कधीच आस्तित्वात नसतील म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींच आस्तित्व जोपर्यंत मी आहे तोपर्यंतच त्यानंतर त्या कुठच नसतील त्या अश्या नष्ट होतील जस त्या कधी exists च करत नव्हता.. मग ह्या सगळ्यांचा, Nostalgia चा अर्थ काहिच नाहीये का? म्हणजे मला वाटत कि nostalgia तुमच्या आयुष्यात दोन प्रकारे contribute करतो एकतर "plesent meories" म्हणुन किंवा "traumas" बाकी त्यांच काहिच होत नाही...मला माझ्या past बद्दल आठवताना किंवा बोलताना तिऱ्हाईत माणसाबद्दल बोलतोय अस सतत जाणवत राहतं...मी ते मुद्दामुन सतत सांगत राहतो दुसऱ्यांना खरतर तेंव्हा मी स्वत:लाच पटवुन देत असतो कि मी ते सगळं जगलोय पण आता मला हे वाटतयं कि मी आता जगतोय आणि जगलेल सगळ तिथच मरुन पडतं म्हणजे एखादा माणुस मरतो आणि त्यानंतर तो नष्ट होतो फक्त शिल्लक राहतात आठवनी ज्यांना कुठलाच physical form नसतो त्या फक्त memories असतात ज्या non material असतात म्हणजे you can't touch them फक्त feel करत राहतो, म्हणजे आपले thoughts जे खरतर exists करत नाहीत ते फक्त illusions असतात we can't consider them realistic.. मग आताच्या क्षणात मी जिंवत आहे मगाशी हे लिहायला सुरु केलेला मी कधीच मेलोय तो फक्त ह्या text मध्ये जिंवत आहे (निदान text exists करतोय तोपर्यंत तरी) आणि तुम्ही हे वाचायला सुरु केलेलं तेंव्हापासुन आताचे तुम्ही जिंवत आहात मगाचे तुम्ही "होता" आता तुम्ही "आहात" आता मुद्दामुन मी ह्यात भविष्याबद्दल काय लिहणार नाही कारण ते पण अजुन exist करत नाही...आता पुढं जे वाक्य किंवा शब्द वाचणार ते तुमच्यासाठी भविष्य असु शकतं पण मी ते आधीच लिहलय त्यामुळं माझा तो past आहे आणि ते पुढचं तुम्ही वाचत तिथपर्यंत पोहचाल तेंव्हा ते "आता" मध्ये बदललं असेल..हे खरच इतकं complex आहे कि मी बनवतोय ते complex?"
_सुशांत मधाळे (तुमच्या "आता" मध्ये exists करणारा)
No comments:
Post a Comment