Monday, October 28, 2024

लिहणं (Writing)

   अचानक काहीतरी लिहायला बसणं किंवा लिहण्याची सवय नसली कि लिहणं खुप कठिण असतं अस मला वाटतं. काय लिहु? कसं लिहु? असे बरेसचे प्रश्न स्त्रवत असतात. खुप विचारांची गर्दी होत असते मग काही क्षणांसाठी वाटतं, हे विचारच लिहावेत का? पण नाही, ते executie करणं खुप अवघड वाटतं, मेंदु ताण घ्यायला नाही म्हणतो, Cognitive dissonance pop up होतो. कदाचित विचारांत Lack of clearity असल्यामुळं लिहताना त्रास होत असावा, त्यातल्या त्यात दिवसभरात असंख्य कामाचे-बिनकामाचे विचार डोक्यात घोंगावत असतात त्यातला एक विचार निवडुन त्यावर लिहणं म्हणजे मॉल मध्ये जाऊन हे घेऊ? का ते घेऊ? करत शेवटी judge होण्याच्या भीतीनं च्युईंग-गम घेऊन बाहेर पडण्यासारखं आहे. lack of decision making मुळं होत असाव हे.

   लिहण्यासारखं आयुष्यात काहीच घडत नाहीये असं हि वाटायला लागतं,आपणच आपल्याला Boare समजु लागतो... मी कसा intresting होऊ शकतो ह्याचं planning डोक्यात शिजु लागतं, आणि हल्ली ह्या social media च्या वादळात आपला attention span आणि Consistency Reels सारखी खालावलीये हे सततच्या brain storming नंतर कळतं आणि माझ्यातली चिकाटी सुद्धा किती Non sticky झालीये हे सत्य माझ्यासमोर नागडं होतं,  त्या सत्यावर कापड टाकायला सुद्धा मी घाबरतो म्हणजे आपण भित्रे आहोत हे कळतं,ती feeling घालवायला दुसरा कुठलातरी उद्योग आपण हातात घेऊन escape व्हायचा प्रयत्न करतो पण आपण किती पळपुटे आहोत ह्याचं एक realisation जोरात तोंडावर येऊन आदळतं मग आपण किती चुकिचे आहोत वैगेरे सारखे विचार डोक्यात लाखो करोडो न्युरोन्स मार्फत Brain steam खाली मज्जासंस्थेतुन travel करत अखंड शरीरभर हा संदेश वाहायला सुरु करतात मग आपण ठरवतो कि ह्यावरच लिहु काहीतरी पण आपलचं नागडेपण लिहायची हिंमत होत नाही किंबहुना ते झेपत नाही आत्महत्येचे विचार येतात पण ती करायला सुद्धा हिंमत लागते त्यामुळ तो विचार सुद्धा रद्द होतो... हातातला पेन आपोआप खाली जमिनीवर पडतो आणि लिहणं नकोच म्हणुन आपण त्या कागदाचं विमान करुन दुर दुसऱ्या Ignorance च्या देशात ते पिटाळुन लावतो...आता कधीतरी जेंव्हा माझ्यातल्या ह्या सगळ्या inferiorties,Complexes, traumas कमी होतील किंबहुना संपतील तेंव्हाच लिहायला बसु असा विचार डोक्यात येतो आणि पुस्तक उघडुन,लिहण्यातुन "वाचलं" पाहिजे असा एक भ्रामक सल्ला मी स्वत:ला देतो निदान सल्ले देण्यात तरी मी पटाईत आहे हा thought माझा ego सुखावुन जातो. 

    -सुशांत मधाळे

Sunday, October 27, 2024

Nostalgia में "मे" कब जिआ?

"जेंव्हा मी माझा past आठवतो तेंव्हा मला अस वाटतं कि मी कोणता तरी सिनेमा बघितलाय आणि त्यातले सीन्स (it's not 'Sins' it's 'Scenes) आठवतोय तो खरच घडुन गेलाय अस मला वाटत नाही म्हणजे काल घडलेली आठवण सुद्धा माझी नाहीये अस वाटतं.. मी कोणतरी वेगळाच आहे जो रोज वेगळा म्हणुन जन्मतो आणि रोज वेगळा जगतो.. काल माझ्यासाठी exists च करत नाही किंवा मी जो 'काल' जगलो तो माझा नाहीये.. मग त्यात माझे past relations, जुने मित्र, चांगल्या वाईट आठवणी हे सगळ दुसऱ्या कुणाच्यातरी आयुष्यात घडलय आणि ते मला माहितेय एवढाच feel होतो,बाकी माझा त्यांच्याशी काहिच संबंध नाही...जुने traumas सुद्धा आठवत नाहीत.. काहीच feel होत नाहीये म्हणजे मी हे आता लिहतोय कदाचित उदया हे वाचल्यावर हे मी लिहलय अस मला वाटणार नाही.. आता हे किती नॉर्मल आहे हे मला खरच माहित नाही किंवा चांगल कि वाईट आहे हे सुद्धा माहित नाही पण हे जग आता ह्या point ला सुरु आहे गेलले सगळ नष्ट होत जातय जे कधीच आपल्याला दिसणार नाही फक्त जाणवत राहिल, आठवणीत राहिल पण ते नाहीये, ते तेंव्हा होत पण आता ते काहीच नाहीये, त्या क्षणाची किंवा तेवढ्या काळाच्या पट्टयातली माणसं फक्त आहेत त्या गोष्टींची साक्षीदार पण ते जेंव्हा जातील तेंव्हा त्या सगळ्या घटनांचा केंद्र बिंदु मी असेन आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंतच त्या असतील माझ्यानंतर त्या पण नष्ट होतील आणि त्या कधीच आस्तित्वात नसतील म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींच आस्तित्व जोपर्यंत मी आहे तोपर्यंतच त्यानंतर त्या कुठच नसतील त्या अश्या नष्ट होतील जस त्या कधी exists च करत नव्हता.. मग ह्या सगळ्यांचा, Nostalgia चा अर्थ काहिच नाहीये का?  म्हणजे मला वाटत कि  nostalgia तुमच्या आयुष्यात दोन प्रकारे contribute करतो एकतर "plesent meories" म्हणुन किंवा "traumas" बाकी त्यांच काहिच होत नाही...मला माझ्या past बद्दल आठवताना किंवा बोलताना तिऱ्हाईत माणसाबद्दल बोलतोय अस सतत जाणवत राहतं...मी ते मुद्दामुन सतत सांगत राहतो दुसऱ्यांना खरतर तेंव्हा मी स्वत:लाच पटवुन देत असतो कि मी ते सगळं जगलोय पण आता मला हे वाटतयं कि मी आता जगतोय आणि जगलेल सगळ तिथच मरुन पडतं म्हणजे एखादा माणुस मरतो आणि त्यानंतर तो नष्ट होतो फक्त शिल्लक राहतात आठवनी ज्यांना कुठलाच physical form नसतो त्या फक्त memories असतात ज्या non material असतात म्हणजे you can't touch them फक्त feel करत राहतो, म्हणजे आपले thoughts जे खरतर exists करत नाहीत ते फक्त illusions असतात we can't consider them realistic.. मग आताच्या क्षणात मी जिंवत आहे मगाशी हे लिहायला सुरु केलेला मी कधीच मेलोय तो फक्त ह्या text मध्ये जिंवत आहे (निदान text exists करतोय तोपर्यंत तरी) आणि तुम्ही हे वाचायला सुरु केलेलं तेंव्हापासुन आताचे तुम्ही जिंवत आहात मगाचे तुम्ही "होता" आता तुम्ही "आहात" आता मुद्दामुन मी ह्यात भविष्याबद्दल काय लिहणार नाही कारण ते पण अजुन exist करत नाही...आता पुढं जे वाक्य किंवा शब्द वाचणार ते तुमच्यासाठी भविष्य असु शकतं पण मी ते आधीच लिहलय त्यामुळं माझा तो past आहे आणि ते पुढचं तुम्ही वाचत तिथपर्यंत पोहचाल तेंव्हा ते "आता" मध्ये बदललं असेल..हे खरच इतकं complex आहे कि मी बनवतोय ते complex?"
    _सुशांत मधाळे (तुमच्या "आता" मध्ये exists करणारा)

Wednesday, October 23, 2024

वाचणं (Reading)

     वाचणं खरतर खुपच complex क्रिया आहे (आता इथं वाचणे म्हणजे कुणाच्या तावडीतुन किंवा संकटातुन नाही तर पुस्तकांची पानं थुंकी लावुन पलटत जाणे आणि त्यावरच्या अक्षरांचा अर्थ लावत जीवनाचा अर्थ शोधायचा प्रयत्न करत ह्या Earth वर भटकत राहणे असा आहे) वाचण्याचा माणसाची उत्क्रांती होत असताना Survive होण्याशी काडीमात्र संबध नाही,तरी हि सध्या वाचनाला काही लोक "Survival Skill" म्हणताना दिसतायेत, अर्थात वाचुन तुम्हाला 'उत्क्रांती आणि Survival' ह्या शब्दांची उत्पत्ती आणि गहन अर्थ कळेल पण त्याचा खऱ्या वास्तववादी जगात Survival साठी किती उपयोग होईल सांगता येत नाही.. फक्त हा माणुस वाचतो म्हणजे बुद्धीजीवी (intellectual) आहे असं समाजाचं उगाच कौतुक मात्र फुकट मिळवता येतं पण नुस्तं वाचुन फुशारकी मारायला वापरायचं Knowledge म्हणजे 'मित्राची बाईक उधार घेऊन शायनिंग मारत गल्लोगल्ली फिरण आणि हि चालवत असलेली गाडी माझी आहे असा समज करुन घेणे' असो,पण काही लोकांना पुस्तक खरेदी करुन ती वाचावीशी वाटतात ह्यातच आपली लुप्त होत जाणारी वाचन संस्कृती धन्यता मानतीये नाहीतर कधीच साहित्य म्हणजे फक्त घरातला किराणा माल असाच काय त्याचा अर्थ उरला असता. त्यात हे असले वाचक म्हणे पुस्तकांना खुप जपतात एकदा घेतलेलं पुस्तक हे जपुन कपाटात ठेवतात आणि परत Emergency मध्ये किंवा 1 जानेवारी ला किंवा 'जागतिक पुस्तक दिन' 'जागतिक वाचक दिवस' 'चला कुणालातरी Impress करुया दिवस' अश्या खास दिवसांसाठीच बाहेर काढुन Aesthetic बघुन तो फोटो सोशल मीडीया वर शेअर करुन खाली शेअरेबाजी करतात आणि लाईक्स, कमेंटस पुरते आपल्या Posts सांभाळतात. 
     वाचाल तर वाचाल हे असलं वाचाळ वाक्य फक्त Truck मागे, एखाद्या लायब्ररीत, शाळेत फळ्यावर, ज्याची पुस्तकं जास्त खपत नाहीयेत असे लेखक, विक्रेते आणि नवोदित वाचकांच्या तोंडी चांगलं वाटतं आणि खरच मला नेहमी त्यांचं कौतुक वाटत आलय आणि त्यात कहर म्हणजे कुठल्यातरी अलौकिक,अलंकारिक शब्दांच्या पेटाऱ्यात हात घालुन,भावनांच्या दोऱ्यात हे Emotions trigger करणारी वाक्य एकामागुन एक गुंफणारा शब्दांचा जादुगर (हातसफाई करणारा) अमुक लेखक आणि त्याची अलंकारिक, अति Romanticize केलेली फक्त त्यालाच कळलेली (ते पण इतर लेखकांच वाचुन)  Psudo-Philosophy आणि हे वाचुन आपल्याला आयुष्य कळलयं (त्या अमुक लेखकांन लिहलेल) हे बऱ्याच जणांना वाटतं जस Osho,J. Krishnamurti ,अमुक गुरु, तमुक philosophy समजवुन सांगणारा ऐकला कि मला निर्वाणाचा मार्ग कळाला असुन मी Enlightine झालोय असं समजणारी काही स्वयंप्रकाशित लोक आणि मग वर्षानुवर्ष दर दिवशी किंवा दिवसाआड Calligraphy केलेली त्या लेखकांची वाक्य status ला टाकुन स्वत:च्या समजेचा Status आपल्या सोशल मिडीया वर निर्धास्तपणे आणि आत्मविश्वासाने (फाजिल) प्रदर्शित करत असतात आणि हल्ली तर trend आलाय आयुष्यात काहीही प्रॉब्लेम आला कि त्यावर एक ना एक तरी पुस्तक सुचवणारे रिळस्टार प्रत्येक scroll गणिक दिसतात पण वाचन संस्कृती हि आत्मशोधाची,मननाची आणि चिंतनाची गोष्ट नसुन फक्त एक कृती आहे हे त्यांनी खरच दाखवुन दिलयं. पण अस नाहीये कि फक्त हि एकच बाजु आहे खरतर नाण्याला नेहमी दोन बाजु असतात unless & until ते नाणं 'शोले' फिल्ममधील नसेल तर (Cinephile लोकांना हा reference समजेल otherwise शोले मधला हा coin वाला सीन कुठल्यातरी रिलवर येईलच, कारण हल्ली मनी चाले ते रिली दिसे अस आहे) तुम्हाला आता प्रश्न पडेल कि हा बाबा का एवढ बोलतोय (लिहतोय)  वाचनाबद्दल, तर हा माझा Complex आहे आणि मी सुरुवातीलाच म्हणटलय (लिहलय) कि, वाचणं खरतर खुपच Complex क्रिया आहे. 
                             _सुशांत मधाळे

Wednesday, October 2, 2024

प्रेम??

प्रेम... हा शब्द वाचला तरी खुप काही तुमच्या डोळ्यासमोरुन जात असेल, मग ती एक particular व्यक्ति असो किंवा वस्तु,खुप भावनांची उलथापालथ होत असेल...(पण इथं आपण वस्तु बद्दल नको बोलायला इथं जेंव्हा जेंव्हा प्रेम हा शब्द येईल तेंव्हा तो Romantic relations बद्दल बोलेल) म्हणजे लहानपणापासुनचं आपण हे सगळ बघत आलोय..माणसं एकत्र येतात, एकमेंकाच्या प्रेमात पडतात आणि मग जादु झाल्यासारखी आयुष्यभर सुखानं एकमेंकाना साथ देतात...प्रेम makes them complete,प्रेम त्यांना पुर्णात्वाकडे नेतं आणि आयुष्यभर ते ज्या अर्थाच्या शोधात असतात तो त्यांना सापडतो... प्रेम करायला आपला मेंदु लहानपणापासुन Subconciously शिकत असतो मग प्रेम म्हणटल कि एकमेंकाची काळजी आली, respect आला, एकमेंकासोबत Adjustment आली आणि त्यासाठी Sacrifice म्हणजेच त्याग आला,आपल्या पालकांना, कूटुंबातील इतर सदस्य, मित्रांना किंवा अगदिच काय आपण पाहत असलेला सिनेमा ह्यात अश्याच प्रकारचं प्रेम करताना बघत आपण लहानाचे मोठे होत असतो आणि आपल्याला वाटतं कि एका प्रेमासाठी एवढ सगळ करायला लागतं आणि तेच आपलं Idea of love होऊन जातं.. पण खरच त्या Adjustment ची, त्यागाची गरज आपल्याला असते का?  कि प्रेम आपल्याला पुर्ण करतं,जीवनाला अर्थ देतं म्हणुन desperetly आपण त्यात राहायचा आणि ते टिकवायचा प्रयत्न करत असतो कारण समाजाचं अस म्हणण असत कि प्रेम, लग्न, संसार हे महत्वाच आहे, माणुस एकटा राहु शकत नाही, एकटं राहण is श्राप आणि आपण एकटं राहु ह्या भीतीनं आपण आपलं स्व:त्व गमावुन प्रेमात forcefully आनंदी असल्याचं स्वत:ला make believe करु देत असतो आणि स्वत:भोवती एक bubble तयार करतो आणि एकट्यात असताना स्वत:ला विचारतो "मला हेच हवं होतं का?" आता ह्याचं उत्तर आपण स्वत:ला किती honestly देतो हे महत्वाचं असतं किंवा कधी कधी भिऊन हा प्रश्नच आपण स्वत:ला विचारत नाही,असो पण मला आठवतयं कि जेंव्हा मी माझ्या recent relation मध्ये होतो आणि समोरच्या माणसानं मला हळुहळु बदलायचा प्रयत्न केला तेंव्हा मला अचानक एकदिवशी वाटल कि, मी जेंव्हा "मी" होतो तेंव्हा स्वत:ला आवडायचो पण कुणालातरी आवडावं म्हणुन मी बदललो आणि त्या समोरच्या व्यक्तिला जसा हवाय तसा झालो पण ह्यात मी "मी" कुठ राहलो, माझ स्वत:वरच प्रेम संपल... म्हणजे तिला जसा हवायं तस मी स्व:ताला mold केलं त्याची माझ्याबद्दल जी Idea of me होती त्यानुसार म्हणजे समोरचा माणुस मी जो मुळ होतो त्यावर प्रेम न करता तिला जो "मी" हवा होतो त्या माझ्या Idea of me च्या तिनं तिच्या मनात तयार केलेल्या "मी" च्या प्रेमात होती.मी खुश नव्हतो पण pretend करायचो आणि बाहेर बाहेर बघता खुप खुश वाटायचो आणि माझ्याकडे बघुन माझ्या मित्रांना, Family ला सुद्धा तेच वाटायचं आणि माझ्याकडे बघुन मला जे लहानपणी मोठ्यांना बघताना वाटायचं तेच माझ्या आजुबाजुच्यांना वाटायचं आणि त्यांना वाटायचं कि "प्रेम खरच किती भारी आहे, त्यात आपल्या जीवनाला पुर्णत्व प्राप्त होऊन आयुष्याला नविन अर्थ प्राप्त होतो" आणि this cycle goes on... आपण कुणावर तो आहे तसा प्रेम करु शकतो का?  हा प्रश्न नक्कीच विचारला पाहिजे आणि सोबतच आपण आता ज्या व्यक्तिसोबत आहोत ती खरच bottom of their heart आपल्यावर प्रेम करते का? का ती सुद्धा आपल्यासारखी एकटं राहण्याच्या भीतीनं आपल्यासोबत राहतीये? ह्यात फरक एवढाच असतो कि एकतर ती आपल्याला त्यांच्या idea of perfect partner मध्ये बदलतीये किंवा तुम्ही तरी ते करत असाल,मग हे खरच प्रेम आहे का भीती? आणि तुम्हाला वाटत असेल कि खरच तुमचं एकमेंकावर प्रेम आहे तर तुम्ही भिऊन हा प्रश्न टाळतायं आणि तुम्ही त्या illusion मध्ये आहात..

why can't we be friends?

  अनपेक्षित भेटी होत राहतात. माणसं आपल्या आयुष्यात येत राहतात, जात राहतात, आणि काही आपल्याला नकळत आतून हलवून जातात. तशीच तीही भेटली. मी आधीच...