Monday, November 6, 2023

विचार आणि बरचं काही...

निरंतर विचारांच्या मालिकेत काही विचार असे असतात जे डोक्यात stuck राहतात,तिकडं गाडी थांबते, ये जा करणारे असंख्य विचार माग traffic jam मध्ये अडकल्यासारखे गर्दी करुन पुढचं clear व्हायची वाट बघत थांबतात पण तो stuck विचार तसाच थांबतो बरा वेळ, रेंगाळतो, त्रास देतो, कधी कधी तर त्याच विचाराला फाटे फुटुन ते मुळ धरुन तिथचं प्रश्नांच एक भलं मोठ वटवृक्ष उभा करतं आणि त्याच्या पारंब्याना आपण लटकत राहतो,तो विचार टाळायला मग TV, मोबाईल, पुस्तक, गाणी, सिगारेटस, दारु असे जालीम उपाय ते झाड तात्पुरतं झाकुन टाकतात पण फक्त तात्पुरत, नकळत ते वर यायचा प्रयत्न करतं पण परत वरचं स्मार्ट फोन्स ते दारु अस चक्र सतत सुरु राहतं पण ते आपण असं टाळतो का?  त्याचा त्रास होत असतो म्हणुन?  का त्याची उत्तर नसतात आपल्याकडं? उत्तर नसतील तर त्यांची उत्तर शोधत का नाही?  आळस?  पण कसला? तुम्ही काहीही करा विचाारांची, प्रश्नांची गाडी अविरत धावत राहणारं आहे तुमच्या डोक्यात, ती गाडी आपण थांबवु शकत नाही पण किमान तिचं steering हातात घेऊन driver व्हायचा प्रयत्न नक्की करु शकतो..वेगाला आळा सयंम पाळा अतिविचार टाळा...



No comments:

Post a Comment

why can't we be friends?

  अनपेक्षित भेटी होत राहतात. माणसं आपल्या आयुष्यात येत राहतात, जात राहतात, आणि काही आपल्याला नकळत आतून हलवून जातात. तशीच तीही भेटली. मी आधीच...